शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदी PM पदाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ
2
गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
3
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
4
राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण
5
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
6
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
7
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
8
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
9
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
10
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
11
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
12
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
13
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
14
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
15
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री
16
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
17
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"
18
VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक
19
"हँडसम आफ्रिदी...", नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी पाकिस्तानी खेळाडूचा संवाद Viral
20
मोदी सरकारमध्ये उत्तर प्रदेशमधून कुणाकुणाला संधी? ही नावं येताहेत समोर   

सेनगावच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त, महसूल व नगर पंचायत प्रशासनाने सुरु केली धडक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 10:49 AM

शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेल्या व्यावसायिक अतिक्रमणाविरोधात गुरुवारी तहसील कार्यालय व नगर पंचायत प्रशासनाने धडक कारवाई केली.

ठळक मुद्देमुख्य रस्त्यावर असलेल्या गट.956 शासकीय जमिनीवर मागील अनेक वर्षांपासून विविध स्वरूपाचे अतिक्रमण करण्यात आले.कसलाही दबाव न घेता प्रशासनाने आज सकाळी ८ वाजेपासून पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली.

सेनगाव ( हिंगोली ) :  शहरात विविध ठिकाणी शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेल्या व्यावसायिक अतिक्रमणाविरोधात गुरुवारी तहसील कार्यालय व नगर पंचायत प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत 100 हुन अधिक लहान-मोठ्या दुकानावर हातोडा फिरवण्यात आल्याने आता हा परिसर मोकळा झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणच्या अतिक्रमणावरील कारवाईचा मुद्दा चर्चेला होता. यात सर्वात जास्त अतिक्रमण हे मुख रस्त्यावर होते. मुख्य रस्त्यावर असलेल्या गट.956 शासकीय जमिनीवर मागील अनेक वर्षांपासून विविध स्वरूपाचे अतिक्रमण करण्यात आले. यात व्यवसायिक दुकाने अधिक होती. यावर आज सकाळी तहसील व नगर पंचायत प्रशासनाने थेट कारवाई केली. 

कसलाही दबाव न घेता प्रशासनाने आज सकाळी ८ वाजेपासून  कारवाईला सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला. कारवाईत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण तसेच आठवडी बाजार व  पोलीसठाण्या समोरील अतिक्रमण काढण्यात आले. 

रात्रीच काढली काही अतिक्रमणे अतिक्रमणे निघणारच हे हे लक्षात येताच कारवाईच्या पूर्वसंध्येलाच अनेक टपरी धारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढुन घेतले. पक्के बांधकाम असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्याचे काम चालू होते. या कारवाईत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार वैशाली पाटिल, मुख्याधिकारी शैलेश फडसे, पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, महसूल व नगर पंचायतचे कर्मचारी यांच्या सह 50 पोलिस सहभागी झाले आहेत.