भटसावंगी येथे मटका जुगाऱ्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:27 IST2021-09-13T04:27:40+5:302021-09-13T04:27:40+5:30

तालुक्यातील भटसावंगी येथे मटका जुगार सुरू असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांच्या पथकाने ...

Action on pot gambling at Bhatsawangi | भटसावंगी येथे मटका जुगाऱ्यावर कारवाई

भटसावंगी येथे मटका जुगाऱ्यावर कारवाई

तालुक्यातील भटसावंगी येथे मटका जुगार सुरू असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांच्या पथकाने भटसावंगी येथे छापा टाकला. यावेळी विश्वनाथ गोविंदा कपाटे (रा. भटसावंगी) हा रवी पंडितराव वाढवे (रा. पांढुर्णा ता. पुसद) याच्या सांगण्यावरून लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका चालवित असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी विश्वनाथ कपाटे याच्याकडून ४ हजार २५० रूपये रोख व एक मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण १९ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले यांच्या फिर्यादीवरून रवी वाढवे, विश्वनाथ कपाटे याच्याविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस हवालदार एन.बी. पोले करीत आहेत .

Web Title: Action on pot gambling at Bhatsawangi