वसमत येथील ऑनलाइन लॉटरी जुगारअड्ड्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST2021-09-07T04:35:24+5:302021-09-07T04:35:24+5:30
वसमत शहरातील कारखाना रोडवरील एका ठिकाणी लॉटरीवर ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उप निरीक्षक ...

वसमत येथील ऑनलाइन लॉटरी जुगारअड्ड्यावर कारवाई
वसमत शहरातील कारखाना रोडवरील एका ठिकाणी लॉटरीवर ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उप निरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्या पथकाने रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास छापा मारला. या वेळी राजेश विजयसा मणी (रा. मंगळवार पेठ) हा लोकांकडून पैसे घेऊन लॉटरीवर ऑनलाइन जुगार खेळवित होता. तर किशन साहेबराव डाके (रा. चोरंबा ता. हदगाव ह.मु. वाखारी) हा जुगार खेळताना आढळून आला. पोलिसांनी सीपीयू, मॉनिटर, माऊस, वायफाय डोंगल, छोटा प्रिंटर, कीबोर्ड, स्कॅनर, इन्व्हर्टर, बॅटरी, प्रिंटर रोल, मिझोराम ऑनलाइन विकली नावाच्या प्रिंटेड चिठ्ठ्या तसेच रोख रक्कम ४ हजार ७२० रुपये असा एकूण ४६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्या फिर्यादीवरून राजेश विजयसा मणी व किशन साहेबराव डाके यांच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस हवालदार पोले करीत आहेत.