अहवाल सादर न केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:03 IST2018-01-17T00:03:40+5:302018-01-17T00:03:43+5:30
तालुक्यातील खानापूर (चिता) येथील गजानन शिक्षण प्रसारक संचलित विद्यासागर विद्यालय येथील शाळेची मान्यता काढून घेण्याकरिता तपासणी करून अहवाल सादर करण्याचे गट शिक्षणाधिका-यांना सांगितले होते. दोन महिने उलटूनही अद्याप कारवाई केली नाही, व अहवालही सादर केला नसल्यामुळे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे यांना नोटीस बजावली आहे.

अहवाल सादर न केल्यास कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील खानापूर (चिता) येथील गजानन शिक्षण प्रसारक संचलित विद्यासागर विद्यालय येथील शाळेची मान्यता काढून घेण्याकरिता तपासणी करून अहवाल सादर करण्याचे गट शिक्षणाधिका-यांना सांगितले होते. दोन महिने उलटूनही अद्याप कारवाई केली नाही, व अहवालही सादर केला नसल्यामुळे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे यांना नोटीस बजावली आहे. सदर शाळेचा चौकशी अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करावा, अन्यथा पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना कळविले जाईल, असेही पत्रात म्हटले.