आठ व्यापाऱ्यांवर हिंगोली शहरात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:36 IST2018-10-26T00:36:30+5:302018-10-26T00:36:48+5:30
नगर परिषद हिंगोली व महराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करून शहरातील दुकानचालक व व्यापाºयांकडील १० किलो प्लास्टिकसाठा जप्त केला. त्यांच्याकडून ४० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आठ व्यापाऱ्यांवर हिंगोली शहरात कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगर परिषद हिंगोली व महराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करून शहरातील दुकानचालक व व्यापाºयांकडील १० किलो प्लास्टिकसाठा जप्त केला. त्यांच्याकडून ४० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
हिंगोली शहरात नगर परिषद व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे प्लास्टिक, थार्माकॉल, अविघनशिल वस्तूंचे उत्पादन, वापर व विक्री, वाहतूक करणाºयांविरूद्ध २५ आॅक्टोबर रोजी मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरात मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्लास्टिक पिशव्या वापरताना व विक्री करताना आढळुन आलेल्या दुकान चालक, व्यापाºयांवर कारवाई करण्यात आली. एकूण १० किलो प्लास्टिकसाठा जप्त करण्यात आला असून ४० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील ८ दुकानांची तपासणी करण्यात आली होती.
सदर कारवाई मंडळाचे क्षेत्र अधिकारी मातकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे, दिनेश वर्मा आदींनी केली.
ज्या दुकानांवर प्लास्टिक किंवा पिशव्या आढळून येतील त्या दुकानचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पथकाने सांगितले.