सहा मटका जुगाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:06+5:302021-07-05T04:19:06+5:30
हिंगोली तालुक्यातील खेर्डा शिवारात कल्याण नावाचा मटका जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने ...

सहा मटका जुगाऱ्यांवर कारवाई
हिंगोली तालुक्यातील खेर्डा शिवारात कल्याण नावाचा मटका जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने खेर्डा शिवारात छापा टाकला असता सहा जण कल्याण नावाचा मटका जुगार खेळवित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख ७ हजार ३०० रुपये, १० हजार रुपयांचा मोबाइल तसेच मटका जुगाराचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून बासंबा पोलीस ठाण्यात गजानन उर्फ बंडू प्रकाशराव गदडे, बाबूराव शेषराव गदडे, शेख वहाब शेख चांद, पंजाब रावसाहेब गडदे, उत्तम सर्जेराव गडदे, रवी वाढवे (सर्व रा. खेर्डा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास पो.ह. पोले करीत आहेत.