विनामास्क फिरणाऱ्या सहा जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:06+5:302021-03-04T04:57:06+5:30

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीसह टाळेबंदी घोषित केली आहे. या दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे ...

Action against six people walking around without masks | विनामास्क फिरणाऱ्या सहा जणांवर कारवाई

विनामास्क फिरणाऱ्या सहा जणांवर कारवाई

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीसह टाळेबंदी घोषित केली आहे. या दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील दोन दुकानांवर कारवाई करीत त्या दोन दुकानदारांना दहा हजारांचा दंड ठोठावला.

जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने न. प. कर्मचारी व पोलिसांच्या संयुक्तिक पथकाची स्थापना केली आहे. १ मार्चपासून जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. तरीही लोकांचे फिरणे काही संपत नाही. २० फेब्रुवारीपासून पथकाने विनामास्क फिरणाऱ्यांची हजेरी घेऊन दंड लावणे सुरू केले आहे. २ मार्च रोजी विनामास्क फिरणाऱ्या नऊ लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १ हजार ८०० रुपये वसूल केले आहेत. ३ मार्च रोजी शहरातील गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या पाहता पथकाने येथे दोन ठिकाणी ठाण मांडले होते. या दोन वर्दळीच्या रस्त्यांवर कारवाई करीत विनामास्क फिरणाऱ्या ६ नागरिकांकडून १ हजार २०० रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. याचबरोबर शहरातील स्टेशन रोडवरील आरा मशीन व जवाहररोडवरील एक गोळ्या बिस्कीट दुकानाने जिल्हा प्रशासनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. के. राठोड, पंडित मस्के, नागेश नरवाडे यांनी केली.

Web Title: Action against six people walking around without masks