हिंगोलीत सहा जुगाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:33 IST2021-09-12T04:33:56+5:302021-09-12T04:33:56+5:30
हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरात झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा ...

हिंगोलीत सहा जुगाऱ्यांवर कारवाई
हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरात झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला असता सहा जण झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले. या वेळी पोलिसांनी २ हजार २५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस नाईक राजूदास जाधव यांच्या फिर्यादीवरून अशोक चतरू चव्हाण, प्रकाश बळीराम भगत, इस्माईल खा जलील खा पठाण (रा. मस्तानशहा नगर), मधुकर रामचंद्र पाईकराव (रा. मस्तानशहा नगर), सुकेश चंद्रिका शहानी (रा. बंडालगंज, जि. गोरखपूर, ह.मु. मस्तानशहा नगर), भुगलाल जगुलाल शहानी (रा. बोहावर, जि. गोरखपूर, ह.मु. मस्तानशहा नगर) यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास जाधव करीत आहेत.
मटका जुगार अड्ड्यावर कारवाई
हिंगोली : औंढा तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे एका मटका जुगाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा १३ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल धोंडबा दिघाडे यांच्या फिर्यादीवरून विश्वनाथ जोरसिंग पवार याच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मोबाइलवर मिलन नावाचा मटका जुगार खेळवीत असताना पोलिसांना आढळून आला.