हिंगोलीत पुन्हा वाहनधारकांना कारवाईचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST2021-09-05T04:33:40+5:302021-09-05T04:33:40+5:30
हिंगोली शहरात वाहतूक शाखेची कारवाई थंडावल्याने पुन्हा एकदा बुलेटचा आवाज वाढल्याचे चित्र आहे. विनाक्रमांकाची वाहने, ट्रिपल सीट, वाहन चालविण्याचा ...

हिंगोलीत पुन्हा वाहनधारकांना कारवाईचा झटका
हिंगोली शहरात वाहतूक शाखेची कारवाई थंडावल्याने पुन्हा एकदा बुलेटचा आवाज वाढल्याचे चित्र आहे. विनाक्रमांकाची वाहने, ट्रिपल सीट, वाहन चालविण्याचा परवाना नसणे यावरून नियमित कारवाई होत होती. मात्र आज त्याला व्यापक स्वरूप देत वाहने आणून वाहतूक शाखेच्या कार्यालयात लावली होती. त्यामुळे ७० ते ८० जणांचा घोळका येथे वाहन सोडण्याची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळत होते. विनाक्रमांकाच्या गाड्या पोलिसांची डोकेदुखी ठरत असून गुन्ह्यांसाठी यातील अनेक गाड्या वापरल्या जात असल्याचेही समोर येत आहे. वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर कदम पाटील, जमादार फुलाजी सावळे, बळीराम शिंदे, रावसाहेब घुमनर, गजानन राठोड, गजानन सांगळे, किरण चव्हाण, शिवाजी पारीसकर, अमित मोडक यांच्या पथकाने इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौकात वाहन तपासणी मोहीम सुरू केली. अचानक सुरू केलेल्या या मोहिमेत अवघ्या दोन तासांत तब्बल ७० ते ८० वाहने पकडली. यामध्ये काही वाहनांवर नंबर नव्हते तर काही वाहनांवर फॅन्सी नंबर टाकण्यात आल्याचे दिसून आले. या सर्वांना दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.