वसमत तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:31+5:302021-09-08T04:35:31+5:30
वसमत शहरातील परभणी रोडवरील एका बिअर शॉपीजवळ अशोक शिवराम बिंगेवार (रा. बुधवारपेठ) याच्याकडून पोलिसांनी १ हजार ५०० रुपये किमतीच्या ...

वसमत तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
वसमत शहरातील परभणी रोडवरील एका बिअर शॉपीजवळ अशोक शिवराम बिंगेवार (रा. बुधवारपेठ) याच्याकडून पोलिसांनी १ हजार ५०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २५ बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दुसरी कारवाई वसमत शहरातील शिवाजी चौक परिसरात करण्यात आली. येथे शाहरूख खॉन शरीफ खॉ पठाण (रा. काजीपुरा रेल्वेस्टेशन रोड) याच्याकडून १ हजार २०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २० बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. वसमत तालुक्यातील मुरूंबा पाटीजवळील एका हॉटेलमधून सिकंदर भीमराव कीर्तने (रा. कन्हेरगाव) याच्याकडून १ हजार ६०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २८ बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोलीस हवालदार भुजंग कोकरे यांच्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तसेच वसमत तालुक्यातील पळशी येथे मिलिंद पंडितराव जमदाडे (रा. पळशी) याच्याकडून १ हजार ६२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २७ बॉटल पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.