जिल्हाभरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST2021-08-02T04:11:06+5:302021-08-02T04:11:06+5:30

रामेश्वर येथे दोन हजारांची दारू जप्त हिंगोली : औंढा तालुक्यातील रामेश्वर येथे पोलिसांनी १ हजार ९२० रुपये किमतीच्या देशी ...

Action against illegal liquor dealers in various places in the district | जिल्हाभरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

जिल्हाभरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

रामेश्वर येथे दोन हजारांची दारू जप्त

हिंगोली : औंढा तालुक्यातील रामेश्वर येथे पोलिसांनी १ हजार ९२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. ही कारवाई ३१ जुलै रोजी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्या फिर्यादीवरून कृष्णा दगडोबा ठाकरे याच्याविरुद्ध औंढा ना. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना टाक करीत आहेत.

१४०० रुपयांची दारू पकडली

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोरेगाव पोलिसांनी १४०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या. याप्रकरणी पोह विश्वनाथ मुकाडे यांच्या फिर्यादीवरून नामदेव पांडुरंग सुतार याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. तपास पोना ढाकरे करीत आहेत.

पेडगाव येथे दारू विक्रेत्यावर कारवाई

हिंगोली : तालुक्यातील पेडगाव येथे एकाकडून पोलिसांनी १ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या बॉटल पकडल्या. ही कारवाई ३१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी सपोउपनि मगन पवार यांच्या फिर्यादीवरून अशोक पुंजाराव पोले याच्याविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गोविंद कदम याने लोखंडी रॉडने मारहाण केली. तर इतरांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोना जोगदंड करीत आहेत.

Web Title: Action against illegal liquor dealers in various places in the district