जिल्हाभरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST2021-08-17T04:34:54+5:302021-08-17T04:34:54+5:30

दुचाकीस्वाराकडून गुटखा जप्त हिंगोली : शासनाने बंदी घातलेल्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने दुचाकीवरून घेऊन जात असताना एकास पोलिसांनी पकडले. ...

Action against gutka sellers in the district | जिल्हाभरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

जिल्हाभरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

दुचाकीस्वाराकडून गुटखा जप्त

हिंगोली : शासनाने बंदी घातलेल्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने दुचाकीवरून घेऊन जात असताना एकास पोलिसांनी पकडले. त्यांचेकडून दुचाकी व ८ हजार ९१० रूपये किमतीचा केशरयुक्त पान मसाला व व्ही -१ तंबाखू जप्त केला. ही कारवाई सेनगाव तालुक्यातील बेलखेडा शिवारात १४ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास केली. याप्रकरणी पोना विलास कुटे यांच्या फिर्यादीवरून शेख असद शेख बिबन (रा. पुसेगाव) याच्याविरुद्ध नर्सी ना. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे करीत आहेत.

साडेनऊ हजारांचा गुटखा पकडला

हिंगोली : येथील भारत वॉटर सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी अभिलाष प्रभाकर डांगे यांच्या बंद टिनाच्या शटरमागे एकाकडून पोलिसांनी ९ हजार ८३२ रूपये किमतीचा विविध नाव असलेला गुटखा जप्त केला. ही कारवाई हिंगोली ग्रामीण पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास केली. याप्रकरणी पोह गजानन पोकळे यांच्या फिर्यादीवरून शेख शारूख शेख रफिक (रा. महादेववाडी) याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यामावार करीत आहेत.

Web Title: Action against gutka sellers in the district