जुगार खेळविणाऱ्याविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST2021-06-24T04:20:54+5:302021-06-24T04:20:54+5:30

नळांना पाणी अनियमितपणे कळमनुरी : शहरातील शास्त्रीनगर, नाईकवाडी मोहल्ला, भोई गल्ली, ब्राह्मणगल्ली, माळी गल्ली, पाटील गल्ली, झमझम कॉलनी, सहयोगनगर, ...

Action against gamblers | जुगार खेळविणाऱ्याविरुद्ध कारवाई

जुगार खेळविणाऱ्याविरुद्ध कारवाई

नळांना पाणी अनियमितपणे

कळमनुरी : शहरातील शास्त्रीनगर, नाईकवाडी मोहल्ला, भोई गल्ली, ब्राह्मणगल्ली, माळी गल्ली, पाटील गल्ली, झमझम कॉलनी, सहयोगनगर, विकासनगर आदी भागात गत २० दिवसांपासून नळांना पाणी अनियमितपणे येत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना त्रास होत आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने याची दखल घेऊन पाणी वेळेवर सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

कळमनुरी : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. परंतु, काही दुचाकी चालक व चारचाकी चालक वाहने रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Action against gamblers