शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागात खळबळ! वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी अवैध खनन प्रकरणी निलंबीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:08 IST

वसमत तहसीलदारांचे मुख्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यालय सोडण्यास मज्जाव.

वसमत (जि. हिंगोली) : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीविरुद्धच्या कर्तव्यात निष्काळजीपणा वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना चांगलाच भोवला असून, ९ एप्रिल रोजी महसूल व वन विभागाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

तहसीलदार शारदा दळवी त्यांच्याविरुद्ध अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात सर्वसामान्यांतून अनेकवेळा नाराजीही पुढे आली होती. अतिमहत्त्वाच्या शासकीय कामात त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आणि निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका महसूल व वन विभागाने ठेवला आहे. हा प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन ठरणारा असल्याने, त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.निलंबन कालावधीत शारदा दळवी यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे निश्चित करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन काळात त्यांना कोणताही खाजगी व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नाही, असेही आदेशान नमूद केले आहे. 

महसूल विभागात खळबळमहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या या निर्णयामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. आता अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज माफियांच्या विरोधात कडक पावले न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा एक इशारा मानला जात आहे. मागील काही महिन्यांपासून तालुक्यात वाढलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीच्या विरोधात ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता, हे विशेष.

English
हिंदी सारांश
Web Title : Wasmat Tehsildar Suspended for Negligence in Illegal Mining Case

Web Summary : Wasmat Tehsildar Sharda Dalvi suspended due to negligence in preventing illegal mining. Numerous complaints were filed regarding unauthorized mineral extraction. Action taken following Governor's order, sending shockwaves through the revenue department.
टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागTahasildarतहसीलदारsuspensionनिलंबनHingoliहिंगोलीsandवाळू