१३८ वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:24+5:302021-02-26T04:43:24+5:30
साक्ष का दिली म्हणून मारहाण हिंगोली : भावाच्या विरोधात साक्ष का दिली या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना सेनगाव ...

१३८ वाहनचालकांवर कारवाई
साक्ष का दिली म्हणून मारहाण
हिंगोली : भावाच्या विरोधात साक्ष का दिली या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना सेनगाव तालुक्यातील साखरा येथे घटली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात रामेश्वर सदाशिव होडबे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी आरोपीने हातात दगड घेत फिर्यादीच्या डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वसमत शहरातून दुचाकी चोरीला
हिंगोली : वसमत शहरातील पाटीलनगरातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी सकळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी डिगांबर विश्वनाथ दळवी (रा. कानोसा, ह.मु. वसमत) यांच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. १५ हजार रुपये किमतीची दुचाकी असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.