कीटक संगोपन कौशल्य आत्मसात करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST2021-02-14T04:27:45+5:302021-02-14T04:27:45+5:30

फुलांची काढणी करण्याचे आवाहन हिंगोली : काढणीस तयार असलेल्या गुलाब, शेवंती, जिलारडिया या फुलांची काढणी लवकर करून घ्यावी. फूल ...

Acquire pest management skills | कीटक संगोपन कौशल्य आत्मसात करावे

कीटक संगोपन कौशल्य आत्मसात करावे

फुलांची काढणी करण्याचे आवाहन

हिंगोली : काढणीस तयार असलेल्या गुलाब, शेवंती, जिलारडिया या फुलांची काढणी लवकर करून घ्यावी. फूल पिकामध्ये तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. गादी वाफ्यावरील रोपांना वेळेवर पाणी द्यावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

रसशोषण करणाऱ्या किडीवर फवारणी करावी

हिंगोली : भाजीपाला पिकांमध्ये रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्झीफेन ५ टक्के, फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के, १० टक्के मि.लि. किंवा डायमिथोएट ३० टक्के १३ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी सायांट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के १८ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

रेल्वे उड्डाण पुलावर दुभाजकाची मागणी

हिंगोली : शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर मागील काही महिन्यांपासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधक, तसेच दुभाजक नाही. विशेष म्हणजे काही वाहनचालक वाहने वेगाने चालवीत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडून येत आहेत. सा. बां. विभागाने याची दखल घेऊन रेल्वे उड्डाण पुलावर गतिरोधकाबरोबर दुभाजकही बसवावे, अशी मागणी होत आहे.

वीजपुरवठा खंडित; शेतकरी त्रस्त

कळमनुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. सद्य:स्थितीत विहिरींना पाणी आहे; परंतु वीज खंडित होत असल्यामुळे रबी हंगामातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जात आहेत. यामध्ये चारचाकी, दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या प्रकारामुळे बहुतांश वेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल

घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Acquire pest management skills