३८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:26+5:302021-05-14T04:29:26+5:30

हिंगोली : ३८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील शुभ कल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या एका संचालकास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...

Accused in Rs 38 crore fraud case handcuffed | ३८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

३८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

हिंगोली : ३८ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील शुभ कल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या एका संचालकास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरबल (ता. कंधार) येथून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहेे. या प्रकरणातील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

शुभ कल्याण मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लि. हावरगाव या सोसायटीच्या संचालक मंडळाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाणे, वसमत, कळमनुरी पोलीस ठाणेसह, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांत ३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २०१७ मध्ये गुन्हे दाखल झाले होते. यातील आरोपी संचालकांच्या मागावर हिंगोलीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक होते. यातील संचालक बापूराव ज्ञानोबा सोनकांबळे (रा. हरबाल, ता. कंधार) हा राहत्या घरी आल्याची माहिती हिंगोलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हरबाल येथे सापळा लावला होता. यावेळी १३ मेच्या पहाटेच्या सुमारास त्यास ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सय्यद, उपनिरीक्षक शेख उमर, पोना. अनिल भुक्तार, नामदेव जाधव, विनोद पुंडगे, मपोह. वगेवार, चालक शिंदे यांच्या पथकाने केली. दरम्यान, या कारवाईमुळे इतर आरोपी संचालक हाती लागण्यास मदत होणार आहे.

Web Title: Accused in Rs 38 crore fraud case handcuffed