विनयभंगप्रकरणी आरोपीस सहा महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:24+5:302021-03-26T04:29:24+5:30
हिंगोली तालुक्यातील बेलोरा येथे २०११ मध्ये पीडित महिला शेतात बैलांना चारापाणी करीत असताना तिला एकटी पाहून आरोपी मदन किसन ...

विनयभंगप्रकरणी आरोपीस सहा महिन्यांची शिक्षा
हिंगोली तालुक्यातील बेलोरा येथे २०११ मध्ये पीडित महिला शेतात बैलांना चारापाणी करीत असताना तिला एकटी पाहून आरोपी मदन किसन सुर्वे (रा. बेलोरा, ता. हिंगोली) याने विनयभंग केला होता. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५१/२०११ मध्ये आरोपी मदन किसन सुर्वे याच्या विरुद्ध ३५४,३२३ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल झाला होता. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनेचा तपास करून दोषारोपपत्र सादर केले होते. हे प्रकरण न्यायाधीश व्ही.व्ही. निवघेकर यांच्या न्यायालयात चालले. यात सरकारतर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम युक्तिवादानंतर न्यायालयाने ३५४ भा.दं.वि. नुसार दोषी ठरवत आरोपी मदन किसन सुर्वे यास सहा महिन्यांचा साधा कारावास व ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मीरा सुपारे यांनी काम पाहिले.