आरोपीस कोठडी; रोकडही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:58 AM2018-05-19T00:58:12+5:302018-05-19T00:58:12+5:30

मित्राचीच तीन लाखांची बॅग पळविणाऱ्या आरोपीस १८ मे रोजी हिंगोली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पळवून नेलेल्या रक्कमेपैकी आरोपीकडील १ लाख ९० रुपये जप्त केल्याची माहिती पोउपनि तानाजी चेरले यांनी दिली.

 Accused Clerk; Cash seized | आरोपीस कोठडी; रोकडही जप्त

आरोपीस कोठडी; रोकडही जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मित्राचीच तीन लाखांची बॅग पळविणाऱ्या आरोपीस १८ मे रोजी हिंगोली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पळवून नेलेल्या रक्कमेपैकी आरोपीकडील १ लाख ९० रुपये जप्त केल्याची माहिती पोउपनि तानाजी चेरले यांनी दिली.
हॉटेलमध्ये शेख भिक्कन शेख मिठ्ठू व अशपाक शहा इसाक शहा भोजन करण्यास दोघे मित्र सोबत गेले होते. परंतु सोबतच्या मित्रानेच तीन लाखांची रोकड असलेली बॅग पळविल्याची घटना घडली. १७ मे रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास हिंगोली शहर ठाण्याचे पोउपनि तानाजी चेरले यांच्याकडे होता. तपासाची सूत्रे फिरवत चेरले यांनी तत्काळ आरोपीस अटक केली. १८ मे रोजी आरोपी अशपाक शहा इसाक शहा यास हिंगोली न्यायालयात हजर केले होते. त्याच्याकडील १ लाख ९० हजारांची रोकडही जप्त केली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे चेरले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
पादचाºयास धडक
हिंगोली : शहरातील जुने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पायी जाणाºया इसमास जीपने धडक दिली. याप्रकरणी १७ मे रोजी जीपचालकाविरूद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील राजू ग्यानदेव शिंदे हे जुन्या एसपी आॅफिसकडे पायी जात होते. यावेळी जीप क्रमांक एमएच-३८-७९५७ च्या चालकाने शिंदे यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी वाहन निष्काळजीपणे चालवून दुखापत केल्याप्रकरणी जीपचालकावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
हिंगोली : पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी शहरासह ग्रामीण भागात कारवाई करून दारूसाठा जप्त केला जातो. पोलीस प्रशासनातर्फे मोहिम राबवूनही शहरासह ग्रामीण भागात चोरट्या पद्धतीने दारूविक्री केली जात आहे. त्यामुळे व्यसनाधिनतेत वाढ होत आहे. पोलिसांनी गुरूवारी दोन ठिकाणी छापा मारून ६ हजार ३४० रूपये किमतीची गावठी दारू पकडली. दारूबंदी कायद्या अंतर्गत पोलिसांनी दोन वसमत तालुक्यातील कुरूंदा व कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर या दोन ठिकाणी कारवाई केली. याप्रकरणी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title:  Accused Clerk; Cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.