शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! रुग्णालयात जाताना काळाने गाठले; आजारी आई, वडिलांसह मुलाचा अपघाती मृत्यू

By रमेश वाबळे | Updated: January 11, 2024 12:34 IST

आईला रुग्णालयात नेताना दुचाकी खड्ड्यात कोसळली; आजारी आई, वडिलांसह मुलाचा मृत्यू

हिंगोली : आईला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना सिरसम बु. ते डिग्रसवाणी रस्त्यावरील एका वळणावर दुचाकीला बुधवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील वडील, मुलगा आणि आई या तिघांचा मृत्यू झाला.  या घटनेमुळे डिग्रसवाणी गावावर शोककळा पसरली आहे.

हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी येथील कलाबाई कुंडलीक जाधव (वय ६०) यांची तब्येत ठिक नव्हती. १० जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजता पती कुंडलीक श्रीपती जाधव (वय ६५) व मुलगा आकाश कुंडलीक जाधव (वय ३०) हे कलाबाई यांना एम.एच.२० एझेड ५७१७ या दुचाकीद्वारे सिरसम बु.येथील रूग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. डिग्रसवाणी ते सिरसम बु.दरम्याच्या वळणावर दुचाकीला अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

ही घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर बासंबा ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. अपघातप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रिया बासंबा पोलिस ठाण्यात सुरू होती. दरम्यान, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच जाधव कुटुंबातील तिघांना काळाने गाठल्याने डिग्रसवाणी गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातHingoliहिंगोली