शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्मितीची क्षमता माता, मातीत आहे-रिठ्ठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:02 IST

मातीतून उगवलेल्या रोपट्यापासून शेती करता येते; हा शोध जगाच्या पाठीवर स्त्रीयांनी लावला आहे. एकेकाळी भारतात मातृसत्ताक पद्धती होती. स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. म्हणूनच नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत आहे, असे प्रतिपादन जिजाऊ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ३ जानेवारी रोजी व्याख्यात्या प्रा. मनीषा रिठ्ठे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मातीतून उगवलेल्या रोपट्यापासून शेती करता येते; हा शोध जगाच्या पाठीवर स्त्रीयांनी लावला आहे. एकेकाळी भारतात मातृसत्ताक पद्धती होती. स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. म्हणूनच नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत आहे, असे प्रतिपादन जिजाऊ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ३ जानेवारी रोजी व्याख्यात्या प्रा. मनीषा रिठ्ठे यांनी केले.अ‍ॅड. ग्यानबाराव सिरसाट विचार मंच महावीर भवन येथे मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या वतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई चव्हाण, उद्घाटक वन अधिकारी मनीषा पाटील, प्रमुख अतिथी कर सहाय्यक अधिकारी कांचन मुटकुळे, अ‍ॅड. सुनीता देशमुख, वर्षाताई सरनाईक, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई कोथळकर, जयश्री घोडे आदींची उपस्थिती होती. प्रा. रिठ्ठे म्हणाल्या, सावित्री घडवायची असेल तर सर्वप्रथम पुरूषांनी ज्योतीबा होणे गरजेचे आहे. तत्कालीन परिस्थितीत सावित्रीबार्इंनी कष्ट केले. तुम्हा आम्हाला शिक्षणाची दारे खुली केली. पण सावित्रीने दिलेले शिक्षण आपण आज घेत नाही. केवळ कागदाची डिग्री म्हणजे शिक्षण नव्हे, कर्मकांडातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारं शिक्षण हवं.महिलांनी शेतीचा शोध लावला, नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत असून यासाठी नवनिर्मिती सृजनशिलता वाढली पाहिजे, या गोष्टींचे पोषण केले पाहिजे, स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. मग ती कोणतीही असो. सती प्रथेपासूनचा जोहारापर्यंतचा प्रवास आजही २१ व्या शतकात बदलला नाही. केवळ स्त्रीमुक्तीच्या गप्पा सुरू आहेत. पण वास्तव मात्र वेगळे आहे. स्त्रीयांनी बालविवाह, सतीप्रथा या खडतर परंपरेतून प्रवास केला. पूर्वीची मानसिकता स्त्रीविकासाला आड येते. त्यामुळे स्त्रीयांनीही स्वत: सक्षम झाले पाहिजे. मुलांना संस्कारित करून महामानवांच्या विचाराची आदर्श पिढी घडविण्याचे काम महिलांवर आहे. आजही स्त्रीयांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. ती केवळ भोगवस्तू म्हणून वापरली जाते, अशी खंतही प्रा. त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक स्त्री अथवा पुरूष वाईट नसतो, वाईट असते ती समाजमनातील मानसिकता. ही मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन ज्योती वारे, अर्चना कोकाटे यांनी केले. तर आभार राजश्री क्षिरसागर यांनी मानले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक