शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून तरुणीवर चाकूचे वार; जिवाच्या आकांताने ती बाहेर पळाली, पाठलाग करून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:42 IST

गोरेगावातील घटनेने जिल्ह्यात खळबळ; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

गोरेगाव (जि. हिंगोली) : तू माझी जिंदगी बरबाद केली, असे म्हणत संजना गजानन खिल्लारी (वय १९) या तरुणीच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करीत तिला ठार मारल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे घडली. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

२० फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संजना आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावरील खोलीत होती. त्यावेळी आरोपी अभिषेक संजय खिल्लारी याने घराच्या दारावर बसलेल्या तिच्या वडिलांना संजना कुठे आहे, असे विचारत घरामध्ये प्रवेश करत वरील खोलीमध्ये गेला. तू माझी जिंदगी बरबाद केली. तू तुझे आई व काकास परवा दिवसाच्या बद्दल का सांगितले, असे म्हणत आरोपीने संजनावर चाकूचे वार केले. संजना जोराने ओरडत गॅलरीत गेली. तेथेही पाठीमागून येत पुन्हा चाकूचे वार केले. घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. संजनाचा आरडाओरडा ऐकून तिचे वडील वरच्या खोलीत गेले असता संजना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शेजारी ग्रामस्थांच्या मदतीने तिला तत्काळ दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

आरोपीला घेतले ताब्यातघटनास्थळावरून पसार झालेला आरोपी युवक काही वेळात स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची चर्चा होती. याबाबत विचारणा केली असता केंद्रा बु.कडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीने पसार होत असताना आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती फौजदार नितेश लेंगुळे यांनी दिली.

रात्री उशिरा गुन्हा दाखलघटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, डीवायएसपी सुरेश दळवे यांनी घटनास्थळाला भेट दिली. शवविच्छेदन व अंत्यसंस्कारानंतर अशोक मारोती खिल्लारी यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात अभिषेक संजय खिल्लारी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके तपास करीत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी