शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाची वर्षभर वसूली केली, पण १० लाखांची रक्कम खिशात घातली; मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:38 IST

बचत गटांमधील महिलांना दिलेल्या कर्जाची वसूल केलेली रक्कम हडपल्याचे आले उघडकीस

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : आखाडा बाळापूर येथील देवीगल्ली भागात कार्यरत असलेले भारत फायनान्स कंपनीची शाखा आहे. येथील कार्यालयातील व्यवस्थापकानेच १० लाख ३७ हजार रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ( दि.१२) रात्री अमोल अरुण मांजरमकर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील देवीगल्ली भागात भारत फायनान्स कंपनीच्या शाखेचे कार्यालय आहे. बचत गटातील महिलांना या कंपनीकडून कर्ज दिले जाते व दर आठवड्याला त्याची वसूली केली जाते.  सदर जमा झालेली रक्कम फायनान्सच्या शाखेत भरणे आवश्यक आहे . परंतु आखाडा बाळापूर शाखेतील संगम व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला अमोल अरुण मांजरमकर (रा. बळीरामपूर, नांदेड ) याने त्याच्याकडे वसूलीतून जमा झालेली रक्कम जमा न करता परस्पर हडप केल्याचे म्हटले आहे. त्याच्याकडे कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव , डोंगरकडा , कुपटी, सापळी, आखाडा बाळापूर , हिवरा आदी गावे होती. या गावात बचत गटांमधील महिलांना कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाची आठवडी हप्त्यानुसार वसूली केली जात होती . 

मात्र दिनांक ं2 फेब्रुवारी 2023 ते 7 मे 2024 या कालावधीत जमा झालेली रक्कम त्याने शाखेत भरणा करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्याची बदली झाल्यानंतर नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांनी सदर गावांमधून महिलांकडून आठवडी हप्ता मागितला असता सदर महिलांनी कर्जाची परतफेड केल्याचे सांगितले. यावरून शाखेने तपासणी केली असता 41 महिलांचे 10 लाख 37 हजार 300 रुपये एवढी रक्कम अमोल मांजरमकर यांने स्वतःकडे ठेवून महिलांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर पैशांचा अपहार केला. याप्रकरणी नांदेड शाखेचे अधिकारी दयानंद बोरकर यांनी दिनांक 12 जुलै रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी अमोल अरुण मांजरमकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ठाणेदार विष्णुकांत गुट्टे पोलीस उपनिरीक्षक गोटके हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली