शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 12:00 IST

कळमनुरीत वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

कळमनुरी ( जि.हिंगोली): कळमनुरी शहरासह परिसरास मंगळवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान वादळी वारा व गारपिटीचा तडाखा बसला. यात तालुक्यातील जटाळवाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मंगळवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जटाळवाडी येथे वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस सुरू झाल्याने देवराव रुद्राजी बाभळे ( 65) यांनी शेतातील झोपडीचा सहारा घेतला. मात्र, वादळाने झोपडीवरील टीनपत्रे उडून गेली. यातच गारपीटीचा मारा वाढला. थंडी, पाऊस आणि गारपीटीच्या मर्याने हृदयविकाराचा झटका येऊन बाभळे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नायब तहसीलदार आनंदराव सुळे यांनी दिली. 

यासोबतच कनका येथेही वादळ वारा व गारांच्या पावसामुळे बापूराव जाधव यांच्या चार शेळ्या, एका गाईचा मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्याने टीनपत्रे उडून दगडाने चार जण जखमी झाले आहेत. कळमनुरी शहरासह मुंढळ, रामवाडी, वाकोडी, आसोलवाडी, मसोड, जटाळवाडी ,कनका, राजुरा ,शिवणी( खुर्द) या परिसरात बागायती पिके पपई, करडई, आंबे, कांद्याच्या बिया व संत्रा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर झाडेही ऊनमडून पडली आहेत. महावितरणचे विजेचे पोल व तारांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून  अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तलाठ्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्रHailstormगारपीटHingoliहिंगोली