शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याची स्थिती; जयंत पाटलांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 23:45 IST

पाटील हे नांदेडहून वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल झाले होते.

हिंगोली : राज्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचे मोठे संकट असताना केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचेच सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने लोकांपर्यंत सरकार पोहोचत नाही. हे सरकारच अस्तित्वात नाही, अशी परिस्थिती असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

पाटील हे नांदेडहून वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल झाले होते. पूरग्रस्तांना मदतीसाठी होत असलेल्या विलंबाबत ते म्हणाले, पंधरा दिवस झाले तरीही सरकार स्थापन असल्याचे वाटत नाही.  मंत्रिमंडळ विस्तार करायला पाहिजे होता. लोकांपर्यंत मदतीसाठी पोहोचायला इतर मंत्र्यांची मदत झाली असती. त्यांच्यात काही मतभेद आहेत का? मंत्रीसंख्या, खातेवाटपात अडकले काय? हे कळायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,  ज्या मंत्रिमंडळावरच अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यांनी असे काहीही निर्णय घेणे अपेक्षित नाही. पूर्वीचा निर्णय बदलून जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा  आहे. कधी जनतेतून तर कधी नगरसेवकातून नगराध्यक्षाची निवड करताना सामान्यांचे प्रश्न सुटतील की नाही? याचा सारासार विचार झाला नाही. नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि नगरसेवक दुसऱ्याच पक्षाचे निवडून आले की त्या शहराच्या विकासाला बाधा पोहोचते, असा पूर्वीचा अनुभव आहे.  यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माधव कोरडे, बालाजी घुगे, संजय दराडे, बी.डी.बांगर, संतोष गुट्टे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार