शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

रस्त्यावर उभ्या ट्रकवर भरधाव टेम्पो धडकला; चार जणांचा मृत्यू, दीडशे मेंढ्याही दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 10:29 IST

आज पहाटे ४ वाजता हिंगोली - नांदेड महामार्गावर झाला भीषण अपघात

- शेख इलियास

कळमनुरी: हिंगोली-नांदेड महामार्गावर माळेगावजवळ उभ्या ट्रकवर आज पहाटे 4 वाजता भरधाव टेम्पो धडकून भीषण अपघात झाला. यात टेम्पो मधील चार जणांचा मृत्यू झाला असून शंभर ते दीडशे मेंढ्याही दगावल्या आहेत. मृतांची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, माळेगावजवळ रस्त्यावर एक ट्रक ( क्रमांक एम. एच.18 बीए-9716) उभा करण्यात आला होता. दरम्यान, कळमनुरीहून एक टेम्पो ( क्र.एच. आर.55 एजे-3111) नांदेडकडे मेंढ्या घेऊन जात होता. पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधाव टेम्पो ट्रकवर पाठीमागून धडकला. धडक एवढी जोरदार होती की टेम्पो चकनाचुर झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक उमर शेख गजानन आगलावे, वसीम शेख, रामेश्वर लोखंडे , बळीराम शिंदे, नवनाथ शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

टेम्पोमधील  4 जखमींना बाहेर काढून येथील जिल्हा रुग्णाला दाखल केले. तिघा जणांना तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. नांदेड येथे उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, टेम्पोमधील शंभर ते दीडशे मेंढयाही या भीषण अपघातात दगावल्या आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीDeathमृत्यू