शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सापडलेला मोबाइल वापरणाऱ्याकडून ५ हजारांची लाच, सायबरच्या पोलिस अंमलदारास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 17:03 IST

कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजारांची लाच, सायबरच्या पोलिस अंमलदारावर गुन्हा

हिंगोली : सापडलेला मोबाइल गैर पद्धतीने वापरत असल्याचे सांगून कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सायबर पोलिस अंमलदारावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ९ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. लाचखोर अंमलदारास अटक करण्यात आली आहे.

बोरी शिकारी (ता.हिंगोली) येथील तक्रारदार हे मार्च २०२३ मध्ये हिंगोली ते सायाळा गावाकडे जात असताना त्यांना गारमाळ उड्डाण पुलाजवळ एक मोबाईल सापडला होता. नातेवाईकांच्या नावे असलेले सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकून ते वापरत होते. दरम्यान २२ एप्रिल २०२३ रोजी त्यांना सायबर सेल हिंगोली येथील पोलिस अंमलदार दिपक पाटील यांनी मोबाईल घेऊन त्यांना बोलविले. त्यामुळे तक्रारदार हे सदर मोबाईल घेऊन सायबर सेलला दाखल झाले.

तेथे पोलिस अंमलदार दिपक पाटील यांनी तक्रारदार यांना सापडलेला मोबाईल जमा करण्यास सांगितले. सदरचा मोबाइल गैर पद्धतीने वापरत असल्याचे सांगून कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच तडजोडी अंती ५ हजार रूपयांची लाच फोन पे द्वारे स्विकारली. 

याबाबत तक्रारदार यांना आपल्याकडून घेतलेली रक्कम ही लाच असल्याची खात्री झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रारी अर्ज केला होता.  या तक्रारी अर्जाच्या चौकशी अहवालावरून पोलिस अंमलदार दिपक हरिदास पाटील (रा.रामकृष्णा सिटी, बळसोंड, हिंगोली) यांचेवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. लाचखोर पोलिस अंमलदारास अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, हिंगोलीचे उप अधीक्षक अनिल कटके  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर तपास करीत आहेत.‌

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली