शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

ब्रेकफेल बसने एकाचा जीव घेतला; पण टिप्पर चालकाने जीवाची बाजी लावत बस अडवली

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: June 8, 2023 19:51 IST

ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित बसची रस्त्यावरील वाहनांना धडक, यात एकाचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी झाले

- हबीब शेखऔंढा नागनाथ (जि. हिंगोली): हिंगोलीवरून परळीकडे जाणाऱ्या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून एका कारला पाठीमागून धडक दिली. यानंतर मोटारसायकलला धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील एक जण ठार, तर कारमधील सात जण जखमी झाले आहेत. यात दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.

८ जून रोजी दुपारी २ वाजेदरम्यान परतवाडा येथून परळीकडे जाणाऱ्या बसचे औंढा ते हिंगोली रोडवर ब्रेक निकामी झाले. यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले. येथील एका लॉजसमोर कारला (क्र. एमएच ३० एटी १४७७) जोराची धडक दिली. यानंतर मोटारसायकल (क्र. एमएच ३८ एल ६६७०) ला धडक दिल्याने मोटारसायकल बसच्या पुढील भागात अडकली. जवळपास दोनशे मीटर मोटारसायकल फरफटत नेल्याने उमरदरी येथील मोटरसायकलस्वार संजय वामन जाधव (वय ३५) हा जागीच ठार झाला.

तर, त्यासोबत असलेले मारोती वामन जाधव (३२) व लहू संजय जाधव (१४) बाहेर फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले. तर, कारमधील धम्मपाल गणपत पुंडगे (वय ४० रा. रुपूर), पार्वतीबाई गणपतराव पुंडगे (वय ५५ रा. रुपूर), रजनी विनय पुंडगे (१७ रा. रुपूर), श्रुती प्रेम धवसे (६, रा. औरंगाबाद), नर्मदा तुकाराम सातपुते (५२, रा. माथा), गजानन तुकाराम सातपुते (३८, रा. माथा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब खर्डे, दीक्षा लोकडे, जमादार रविकांत हरकळ, गजानन गिरी, मोहम्मद शेख, अमोल चव्हाण, किशोर परिस्कर, सय्यद बेग आदींनी भेट दिली व गर्दीला पांगविले.

बसच्या समोर टिप्पर केले आडवे...ब्रेक फेल झालेल्या बसचा वेग अधिक होता. त्यामुळे ही बस कार व मोटारसायकलला धडक देऊन पुढे जातच होती. या दरम्यान समोरून येणाऱ्या टिप्पर चालकाच्या ही बाब लक्षात आली. त्याने टिप्पर बसच्या समोर आडवे केले. त्यामुळे वेगात येत असलेली बस जागेवर थांबली. या बसमध्ये एकूण आठ प्रवासी होते. या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचली नाही.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीDeathमृत्यू