शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जंगी पाहुणचाराच्या आधी 'व्याह्यांचा' अपघात; दुचाकीवरून कॅनलमध्ये कोसळून दोघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 20:30 IST

बाळापुर - शेवाळा रोडवरील भीषण दुर्घटनेत ' व्याह्यांचा '  मृत्यू ....

- रमेश कदम आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : बाळापुरवरून  जंगी पाहुणचाराचे सामान घेऊन दुचाकीने गावाकडे निघालेल्या व्याह्यांच्या दुचाकीला कॅनॉलच्या पुलावर अपघात झाला. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने कॅनलच्या कठड्यावर गाडी जोरात आदळली. त्यानंतर दोघेही कठड्यावरून कॅनॉलमध्ये पडले. यावेळी कॅनॉलमधील दगडावर पडल्याने डोक्याला जोरदार मार लागून गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला. गणेश मारुती डोके आणि भाऊराव श्रीराम हेगडे अशी मृतांची नाव आहेत.

आखाडा बाळापूर ते शेवाळा या रोडवर दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील रहिवासी असलेले गणेश मारुती डोके (अंदाजे वय 55 ते 60 ) हे व त्यांचे व्याही भाऊराव श्रीराम हेगडे ( राहणार साखरा ,तालुका उमरखेड ,जिल्हा यवतमाळ ) हे दोघेजण बाळापुर येथे आले होते. सामान खरेदी करून दुचाकीने उंचाडा गावाकडे निघाले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गावाकडे जात असताना दुचाकी बाळापूर ते शेवाळा रोडवरील कॅनलच्या पुलावर गेले असता वळण रस्त्यावर त्यांची गाडी नियंत्रणा बाहेर गेली. भरधाव वेगात गाडी कठड्यावर आदळली . गाडीवरील दोघेही जण कठड्यावरून उडून कॅनालमध्ये पडले. 

कॅनालमध्ये असलेल्या दगडांवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यात एकजण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याला ॲम्बुलन्सने नांदेडला घेऊन जात असताना वारंग्यापर्यंत जाताच त्याचाही मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. दोघांचाही मृतदेह बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी सांगितले . घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, जमादार राजीव जाधव , शिवाजी पवार घटनास्थळी पोहोचले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यांच्या नातेवाईकांना खबर दिली. या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असली तरी याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

जंगी पाहुणचाराची तयारी जीवावर बेतली....व्याही घरी आल्यामुळे पाहुणचार करण्यासाठी ते बाळापूरला आले. जंगी पाहुणचार करण्यासाठी बाळापुरातून सामान घेऊन  गावाकडे जाताना ही दुर्दैवी घटना घडली .पाहूणचाराची जय्यत तयारी करत असताना हा अपघात घडून व्याह्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली