सचखंड बोर्डासाठी ९८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:59 IST2018-12-28T23:59:13+5:302018-12-28T23:59:37+5:30
नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड बोर्डासाठी कळमनुरी तालुक्यातील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर २८ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले.

सचखंड बोर्डासाठी ९८ टक्के मतदान
कळमनुरी : नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड बोर्डासाठी कळमनुरी तालुक्यातील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर २८ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले.
एकूण ६२ मतदारांपैकी ६१ मतदारांनी आपला हक्क बजावला असून ९८ टक्के मतदान झाले आहे. यात ३३ पुरूष तर २८ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार सतीष पाठक हे होते. तर अव्वल कारकुन कदम, नाईक, डाकोरे, मंडळ अधिकारी हे मतदान अधिकारी होते. तसेच क्षेत्रीय अधिकारी म्हणून तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी काम पाहिले. सकाळी ९ वाजता निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मनियार यांनी मतदान केंद्रास भेट देवून पाहणी केली. मतदान केंद्रावर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयात होणार आहे.