औंढा नागनाथ तालुक्यात ९७ जणांचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST2020-12-30T04:39:11+5:302020-12-30T04:39:11+5:30
औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी १७ ग्रामपंचायतींसाठी ९७ जणांनी उमेदवारी अर्ज ...

औंढा नागनाथ तालुक्यात ९७ जणांचे अर्ज दाखल
औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी १७ ग्रामपंचायतींसाठी ९७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान सलग तीन दिवस सुट्टी आल्याने सोमवार, २८ डिसेंबर राेजी औंढा नागनाथ तहसील परिसरात अनेक उमेदवारांनी सकाळपासूनच गर्दी केली हाेती. तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ९७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये पुरजळ १४, काठाेडा १, सेंदुरसना १२, आजरसाेंडा १, लाेहा खु. ४, असाेला तर्फ लाख १, सिध्देश्वर ९, दुघाळा ८, पूर ११, उमरा ३ , दाैंडगाव ४, वडचुना २, दुरचुना ३, रूपूर १०, गाेळेगाव १, येडूद ९, राजापूर ४ अशी एकूण ९७ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी दिली.