९५ हजारांच्या बनावट नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 05:19 IST2017-08-19T05:19:12+5:302017-08-19T05:19:14+5:30

कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणा-या तिघांना हिंगोली शहर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले.

9 52 thousand fake currency seized | ९५ हजारांच्या बनावट नोटा जप्त

९५ हजारांच्या बनावट नोटा जप्त


हिंगोली : कारमधून ९५ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जाणा-या तिघांना हिंगोली शहर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. या आरोपींना शुक्रवारी हिंगोली न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मो. साकीम मो. अयुब (रा. कारंजा जि. वाशिम), सय्यद मो. मकसूद (रा. नागपूर), शेख मोहसिन शेख मुक्तार (रा. बाळापूर जि. अकोला) अशी या तिघांची नावे आहेत. तिघेजण कारमधून बनावट नोटा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

Web Title: 9 52 thousand fake currency seized