८२४७ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:15 IST2018-02-19T00:14:18+5:302018-02-19T00:15:49+5:30
शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची १८ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील ९६ केंद्रावरून परीक्षा घेतली. परीक्षेस ८ हजार २४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ३३३ विद्यार्थी गैरहजर होते. यावेळी शिक्षण विभागातील पथकांनी परीक्षास्थळी भेटी देऊन पाहणी केली.

८२४७ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची १८ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील ९६ केंद्रावरून परीक्षा घेतली. परीक्षेस ८ हजार २४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ३३३ विद्यार्थी गैरहजर होते. यावेळी शिक्षण विभागातील पथकांनी परीक्षास्थळी भेटी देऊन पाहणी केली.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सेनगाव, हिंगोली, वसमत, कळमनुरी व औंढा येथील एकूण ९६ केंद्रावरून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. शिक्षण विभागातर्फे परीक्षा केंद्रांना भेटीसाठी पथकांची नियुक्ती केली होती. हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील परीक्षा केंद्रास शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे, केंद्रेकर, लोंढे, भगत तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी दिपक चवणे, गटशिक्षणाधिकारी थोरात यांनी वसमत येथील बर्हिजी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
शिक्षण विभागामार्फत रविवारी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडली. हिंगोली तालुक्यातील केंद्रावरून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेस एकूण ११२७ पैकी १०८८ जणांनी परीक्षा दिली. तर ३९ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. सेनगाव ८६० पैकी ८४३, १७ गैरहजर राहिले. वसमत ९४४ पैकी ९३१ मुलांनी परीक्षा दिली. १३ उनुपस्थित होते. कळमनुरी ९४३ पैकी ९११ विद्यार्थी परीक्षेस हजर होते. ३२ जण परीक्षेस गैरहजर होते, तर औंढा नागनाथ ८४० पैकी ८२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १५ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले. एकूण ४७१४ पैकी ४५८९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. ११६ अनुपस्थित राहिले.
आठवीतील परिक्षार्थी
४हिंगोली तालुक्यातील परीक्षा केंद्रावरून इयत्ता आठवीतील एकूण ९४८ पैकी ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २९ विद्यार्थी गैरहजर होते. सेनगाव ५३९ पैकी ५२१ जणांनी परीक्षा दिली. १८ अनुपस्थित, वसमत ८०७ पैकी ७८३ मुलांनी परीक्षा दिली. २४ गैरहजर, कळमनुरी ८६९ पैकी ८३७ विद्यार्थी परीक्षेस बसले. तर ३२ अनुपस्थित होते. औंढा नागनाथ ६०३ पैकी ५८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १४ गैरहजर होते. एकूण ३७६६ पैकी ३६४९ जणांनी परीक्षा दिली.