८० हजारांच्या शेळ्या लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:47+5:302021-03-27T04:30:47+5:30
कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. शेतकरीही आता शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करीत आहेत. यातून कोरोनाच्या काळात उदरनिर्वाहास ...

८० हजारांच्या शेळ्या लांबविल्या
कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. शेतकरीही आता शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करीत आहेत. यातून कोरोनाच्या काळात उदरनिर्वाहास मदत होत आहे. चार पैसे मिळत असल्याने अनेक जण या व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, आता शेळीपालन करणाऱ्यांकडे चाेरट्यांनी मोर्चा वळविला आहे. औंढा तालुक्यातील रामेश्वर येथे एका शेळीपालन करणाऱ्याच्या ८० हजार रुपये किमतीच्या शेळ्या चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. येथील गजानन नानासाहेब शिंदे हे शेळीपालन व्यवसाय करतात. त्यांनी तारेचे कंपाउंड करून त्यात ते शेळ्या बांधत होते. २५ मार्चच्या रात्री त्यांच्या १३ शेळ्या, ५ पाठरू व ३ पिले, असा ८० हजारांच्या शेळ्या चोरट्यांनी लांबविल्या. या घटनेमुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. याप्रकरणी गजानन नानासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून औंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.