कोरोनाचे नव्याने ७३ रुग्ण; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST2021-03-17T04:30:30+5:302021-03-17T04:30:30+5:30
आज बरे झालेल्या १८ जणांना हिंगोली येथील सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना केअर सेंटर, लिंबाळा येथून भोईपुरा ...

कोरोनाचे नव्याने ७३ रुग्ण; एकाचा मृत्यू
आज बरे झालेल्या १८ जणांना हिंगोली येथील सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना केअर सेंटर, लिंबाळा येथून भोईपुरा १, रिसाला बाजार २, पेन्शनपुरा १, लाला लजपतरायनगर १, लोहारनगर १, तर औंढा केअर सेंटरमधून एकास घरी सोडले आहे.
औंढा तालुक्यातील येडूद येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा आता ६७ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण ४९२० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४३९४ जण बरे झाले आहेत, तर सध्या ४५९ जणांवर उपचार सुरू आहेत. दाखल असलेल्यांपैकी ३० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ८ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.