जिल्ह्यात ७१३ जणांनी केले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:21+5:302021-03-04T04:57:21+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील २२ शासकीय आरोग्य संस्था व दोन खासगी रुग्णालयांत बुधवारी एकूण ७१३ जणांनी लसीकरण केले. यात ...

713 people were vaccinated in the district | जिल्ह्यात ७१३ जणांनी केले लसीकरण

जिल्ह्यात ७१३ जणांनी केले लसीकरण

हिंगोली : जिल्ह्यातील २२ शासकीय आरोग्य संस्था व दोन खासगी रुग्णालयांत बुधवारी एकूण ७१३ जणांनी लसीकरण केले. यात ६० वर्षांवरील ४१० जणांचा समावेश होता.

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहात आरोग्य कर्मचारी ३१, इतर विभागातील ४०, दुसरा डोस लसीकरणाची संख्या ३, ४५ ते ६० वर्षांखालील इतर आजार असणारी लसीकरणाची संख्या २६, ६० वर्षांवरील लसीकरणाची संख्या ७९, कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी २, इतर विभागातील ९, दुसरा डोस ७, इतर आजार असणाऱ्या लसीकरणाची संख्या २२, ६० वर्षांवरील लसीकरणाची संख्या ७७, प्रा. आ. केंद्र पोत्रा आरोग्य कर्मचारी ४, दुसरा डोस ४८, ६० वर्षांवरील ५, प्रा. आ. केंद्र वाकोडी येथे दुसरा डोस लसीकरणाची संख्या ५, प्रा. आ. केंद्र मसोड येथे इतर विभागातील कर्मचारी १, दुसरा डोस घेणारे ४, ६० वर्षांवरील लसीकरणाची संख्या ११, प्रा. आ. केंद्र आखाडा बाळापूर आरोग्य कर्मचारी १८, दुसरा डोस लसीकरणाची संख्या १८, साठ वर्षांखालील लसीकरणाची संख्या १०, साठ वर्षांवरील लसीकरणाची संख्या २३, प्रा. आ. केंद्र रा. तांडा येथे दुसरा डोस लसीकरण ८, ग्रामीण रुग्णालय औंढा येथे आरोग्य कर्मचारी ६, दुसरा डोस १५, साठ वर्षांखालील लसीकरण संख्या २१, साठ वर्षांवरील ४८, उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे आरोग्य कर्मचारी ८, इतर विभागातील कर्मचारी ९, दुसरा डोस २१, साठ वर्षांखालील ५६, साठ वर्षांवरील २४, प्रा. आ. केंद्र कुरुंदा येथे दुसरा डोस ४, साठ वर्षांवरील लसीकरण १२, प्रा. आ. केंद्र हट्टा येथे आरोग्य कर्मचारी १, इतर विभागातील ७, दुसरा डोस ५, साठ वर्षांखालील ४, साठ वर्षांवरील लसीकरण १७, प्रा. आ. केंद्र सेनगाव येथे आरोग्य कर्मचारी १, इतर विभागातील १, दुसरा डोस १, साठ वर्षांवरील ४२, प्रा. आ. केंद्र गोरेगाव येथे साठ वर्षांखालील लसीकरण संख्या ६, साठ वर्षांवरील लसीकरणाची संख्या १३, प्रा. आ. केंद्र कवठा येथे आरोग्य कर्मचारी ३, साठ वर्षांवरील लसीकरणाची संख्या २९, प्रा. आ. केंद्र साखरा येथे आरोग्य कर्मचारी ३, इतर विभागातील १, दुसरा डोस २, साठ वर्षांवरील लसीकरणाची संख्या ३, स्नेहल नर्सिंग होम हिंगोली येथे ४५ ते ६० वर्षांखालील इतर आजार १३, साठ वर्षांवरील लसीकरण २७ लसीकरण करण्यात आले.

Web Title: 713 people were vaccinated in the district