कोरोनाचे नवे ७ रुग्ण ; १४ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:41+5:302021-06-19T04:20:41+5:30

हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत सेनगावात १३१ पैकी उटी बु. येथे एक रुग्ण आढळला. तर हिंगोलीत १०६, वसमतला १४, औंढ्यात ...

7 new corona patients; 14 Good | कोरोनाचे नवे ७ रुग्ण ; १४ बरे

कोरोनाचे नवे ७ रुग्ण ; १४ बरे

हिंगोली जिल्ह्यात अँटिजन चाचणीत सेनगावात १३१ पैकी उटी बु. येथे एक रुग्ण आढळला. तर हिंगोलीत १०६, वसमतला १४, औंढ्यात १०४ व कळमनुरी परिसरात २२० जणांची चाचणी केल्यावर एकही बाधित आढळला नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात ८२ पैकी पारडा १, शाहूनगर १ असे २, औंढा परिसरात २८ पैकी पारडी सावंगीत १, वसमत परिसरात ७४ पैकी सोमठाणा १, इंजनगाव १, धामणगाव २ असे चार रुग्ण आढळले. सेनगावात ६ व कळमनुरीत २६ चाचण्यांत एकही बाधित नाही. बरे झाल्याने जिल्हा रुग्णालयातून १३ तर सेनगावातून एकास डिस्चार्ज दिला.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ८९९ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ४७० जण बरे झाले. सध्या ५० जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३७९ जणांचा मृत्यू झाला. सध्या दाखल असलेल्यांपैकी २६ जण ऑक्सिजनवर तर ४ जण बायपॅपवर आहेत.

Web Title: 7 new corona patients; 14 Good