चालकाच्या प्रसंगावधनाने ६१ प्रवासी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:17 IST2018-02-04T00:17:03+5:302018-02-04T00:17:11+5:30
तालुक्यातील पिंपळदरी फाट्याजवळ नागपूरहून परभणीकडे येणारी बस क्र.एम.एच.२० बी.एल. ३६०३ चे माणिक किशनराव राऊत या चालकाने प्रसंगावधान राखून समोरून येणाºया व हिंगोलीकडे जाणाºया मळीचे ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्यावर बस रस्त्याच्या खाली उतरवल्याने चक्क ६१ प्रवाशांसह सात ते आठ पासधारक सुखरूप बचावल्याची घटना ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

चालकाच्या प्रसंगावधनाने ६१ प्रवासी बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी फाट्याजवळ नागपूरहून परभणीकडे येणारी बस क्र.एम.एच.२० बी.एल. ३६०३ चे माणिक किशनराव राऊत या चालकाने प्रसंगावधान राखून समोरून येणाºया व हिंगोलीकडे जाणाºया मळीचे ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्यावर बस रस्त्याच्या खाली उतरवल्याने चक्क ६१ प्रवाशांसह सात ते आठ पासधारक सुखरूप बचावल्याची घटना ३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
ट्रॅक्टर क्र. एम.एच.४३ यु. ४६९२ चालक चव्हाण मळीने भरलेला ट्रॅक्टर हिंगोलीकडे जात होता. समोरून येणारी परभणी-नागपूर बसवर समोरून चालकाच्या बाजुने धडकणार एवढ्यात बसचालकाने प्रसंगावधान राखून बस चक्क रस्त्याच्याखाली घेवून प्रवाशी वाचवले. यामध्ये जवळा बाजार येथील शिवाजी रामराव (३२) यांच्या कंबरेला किरकोळ मार लागला. अपघाताची माहिती मिळताच पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून पुढील उपचारासाठी पाठवले. अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्याचे काम चालू होते.