शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री ६ दुकाने फोडली; औषधी, किरणासह रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 14:02 IST

शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

- इस्माईल जाहागिरदारवसमत: शहरातील नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स व एसबीआय बँक परीसरातील ६ दुकानांचे चोरट्यांनी शटर वाकवून चोरी केली. दुकानातील किराणा, औषधासह नगदी ९५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

शहरात आज पहाटे नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स व एसबीआय बँक परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. येथील किराणा दुकान, कृषी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, औषधी दुकान, जनरल स्टोअर्स या दुकानांची शटर वाकवून चोरटे आत शिरले. किराणा सामान, औषधीसह सेतू सुविधा केंद्रामधील ९५ हजार रुपये चोरट्यांनी पळवले. दरम्यान, दुकानांचे शटर वाकवून दुकानात प्रवेश करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी शहर पोलिस प्रयत्न करत आहेत. 

घटनास्थळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम, जोंधळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. गेल्या वर्षी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. शहर पोलिस ठाण्याचे पोनि कदम यांनी गुन्हेगारीवर पकड निर्माण करताच शहरातील चोऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. दरम्यान, एकाच रात्री ६ दुकाने फोडल्याने शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली