जिल्ह्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण; ७ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:30+5:302021-01-14T04:25:30+5:30

हिंगोली जिल्ह्यात बुधवारी हिंगोली १०, वसमत १८, सेनगाव ४, कळमनुरी ३४, औंढा १ अशा ६७ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. ...

6 new corona patients in the district; 7 Good | जिल्ह्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण; ७ बरे

जिल्ह्यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण; ७ बरे

हिंगोली जिल्ह्यात बुधवारी हिंगोली १०, वसमत १८, सेनगाव ४, कळमनुरी ३४, औंढा १ अशा ६७ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. यात औंढा तालुक्यातील सावळी खु. येथील एक युवक बाधित आढळला. तर आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीच्या विद्यानगरचे ४ व सरस्वतीनगरचा एक असे पाच जण बाधित आढळून आले आहेत. बरे झालेल्यांमध्ये विद्यानगर १, कोथळज १, जमदया १, हिंगोली १, जावळी १, वसमत १, जलालधाबा १ अशा एकूण ७ जणांचा समावेश आहे.

कोरोनाचे एकूण ३,६०८ रुग्ण झाले आहेत. ३,४८३ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला एकूण ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्ड येथे भरती असलेल्या रुग्णांपैकी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यास बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आराेग्य विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: 6 new corona patients in the district; 7 Good