शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

कळमनुरी तालुक्यातील ५० टक्के बालके कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:58 IST

कुपोषणमुुक्तीत जिल्ह्याने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याला मुंबई येथे २ आॅक्टोबर रोजी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील ग्राम बालविकास केंद्राचे राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली. केंद्रात दाखल ५० टक्के बालकांना कुपोषणमुक्त करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : कुपोषणमुुक्तीत जिल्ह्याने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याला मुंबई येथे २ आॅक्टोबर रोजी महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील ग्राम बालविकास केंद्राचे राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली. केंद्रात दाखल ५० टक्के बालकांना कुपोषणमुक्त करण्यात आले आहे.कुपोषणमुक्तीत जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दील उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, व त्यांच्या टीमचा महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामबाल विकास केंद्र सुरू करून जास्तीत जास्त बालकांना कुपोषणमुक्त केलेल्या राज्यातील ५ जिल्हे निवडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हिंगोली जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यात ५ जून ते ८ सप्टेंबर दरम्यान कळमनुरी, वसमत, हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, आखाडा बाळापूर येथील बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत बाल ग्रामविकास केंद्र सुरू करण्यात आले. या केंंद्रातच ४४४ तीव्र कमी वजनाच्या बालकांना दाखल केले. या केंद्रातच बालकांना आहार, औषधी देण्यात आल्या. दिवसांतून आठ वेळा आहार देण्यात आला. त्यामुळे ही १८३ बालके मध्यम वजनात आले ही टक्केवारी ४१.२२ टक्के आहे. तीव्र कमी वजनातून २१८ बालके सर्वसाधारण श्रेणीत म्हणजेच कुपोषणमुक्त झालीत. कुपोषमुक्त झालीत. जिल्ह्यातील कळमनुरी येथील ३, हिंगोली व औंढा नागनाथ येथील प्रत्येकी २ अशा एकूण ५ बालकांना १५ दिवस जिल्हा सामान्य रूग्णलयातील पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. या बालकांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १५ दिवस उपचार करत पोषण आहार देण्यात आला. या केंद्रात या ५ बालकांच्या आई-वडिलांनाही सोबत ठेवण्यात आले होते. तीव्र कमी वजनातील बालकांना बालग्रामविकास केंद्रात ६० दिवस दाखल करूनही तीव्र कमी वजनाच्या ३४ बालकात सुधारणा झाली नाही. तर ४ बालकांनी बाल ग्रामविकास केंद्र मध्येच सोडून गेले. जवळपास ५० टक्के बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील बालग्रामविकास केंद्राने उत्कृष्ट कार्य केले आहे. यात अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी आर.एम. धापसे यांनी सांगीतले. कुपोषण मुक्तसाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे विशेष लक्ष दिले जात असून संबधित यंत्रणेला तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.ग्राम बालविकास केंद्रात होणार वाढ

  • कळमनुरी तालुक्यात २५० अंगणवाड्या आहेत. पहिल्या टप्प्यात तालुक्यात २२ ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्यात आली होती. यात ४५ तीव्र कमी वजनाच्या बालकांना दाखल केले होते. यातील ६० ते ६५ टक्के बालकांना कुपोषण मुक्त करण्यात यश आले आहे. दुस-या टप्प्यातील ग्राम बालविकास केंद्रे येत्या आठवड्यात सुरु होणार आहेत. सध्या अंगणवाड्यामार्फत ० ते ६ वयोगटातील बालकांचे वजन, उंची, दंड, घेर घेण्यात येत आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या बालकांना ग्राम बालविकास केंद्रे सुरू करून त्यांनाही कुपोषणातून बाहेर काढण्यात येणार आहे.
  • ग्राम बालविकास केंद्रात ८ वेळा पोषण आहार देऊन बालकांचे वजन वाढविले जात आहे. सीईओ डॉ. एच.पी. तुम्मोड व गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कुपोषण मुक्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
टॅग्स :Hingoliहिंगोलीfoodअन्नHealthआरोग्य