गिरगावात ५० उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:17 IST2021-01-13T05:17:14+5:302021-01-13T05:17:14+5:30

गिरगाव येथे ६ प्रभागांतील १७ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. निवडणूक आखाड्यात दोन अपक्षांसह ५० उमेदवारांमध्ये चुरशीची लढत हाेणार ...

50 candidates in the fray in Girgaum | गिरगावात ५० उमेदवार निवडणूक रिंगणात

गिरगावात ५० उमेदवार निवडणूक रिंगणात

गिरगाव येथे ६ प्रभागांतील १७ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. निवडणूक आखाड्यात दोन अपक्षांसह ५० उमेदवारांमध्ये चुरशीची लढत हाेणार आहे. प्रभाग क्र १ ते ६ मध्ये नवसंजीवनी ग्रामविकास पॅनल व गिरगाव ग्रामविकास पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गिरगाव येथे प्रचाराचा जोर चांगलाच वाढत आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी ग्रा.प. निवडणुकीच्या गप्पांना रंगत आली आहे. १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. यामध्ये आपले पॅनल विजयी करण्यासाठी उमेदवारांसह पॅनल प्रमुखही राजकीय समीकरण जुळवत आहेत. ग्रामविकास पॅनलने गिरगावातील जिजाऊ चौकात रविवारी जाहिरनामा प्रकाशित करुन प्रचाराचा सुरूवात केली आहे. मागील पाच वर्षांपासून माजी पं. स. सदस्य देवीदास कऱ्हाळे यांच्या ताब्यात असून पंचवार्षिक कामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवून ग्रामविकास पॅनल जनतेसमोर मत मागण्यासाठी जात आहे.

Web Title: 50 candidates in the fray in Girgaum