जिल्ह्यात कोविडचे नवीन ५ रुग्ण ; तर ८ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST2021-01-03T04:30:33+5:302021-01-03T04:30:33+5:30

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर ३, वसमत ३२, सेनगाव ५, औंढा नागनाथ १५ तर कळमनुरी ...

5 new patients of Kovid in the district; So 8 is better | जिल्ह्यात कोविडचे नवीन ५ रुग्ण ; तर ८ बरे

जिल्ह्यात कोविडचे नवीन ५ रुग्ण ; तर ८ बरे

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर ३, वसमत ३२, सेनगाव ५, औंढा नागनाथ १५ तर कळमनुरी येथे १५ एकुण ७० जणांची तपासणी केली. आरटीपीसीआरद्वारे वसमत येथे २ तर कळमनुरीत ३ असे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सिरली येथील ४० वर्षीय महिला तर कळमनुरी तालुक्यातील माळेगाव येथील १५ वर्षीय मुलगी तसेच रेणापूर येथील २५ वर्षीय दाेन तरुण आढळलेे आहेत.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डमध्ये भरती असलेल्या कोविड रुग्णांपैकी २ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन सुरू आहे़ २ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवले आहे, अशा एकूण ४ रुग्णांवर सद्य:स्थितीत उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविडचे एकूण ३ हजार ५२५ रुग्ण झाले असून त्यापैकी ३ हजार ४२६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोविडमुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 5 new patients of Kovid in the district; So 8 is better

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.