जिल्ह्यातील ४४५ लाभार्थींनी घेतला पीएम स्वनिधी योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST2021-02-05T07:52:28+5:302021-02-05T07:52:28+5:30
फेरीवाल्यांचे आर्थिक उन्नतीसाठी शासनाने पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी २ हजार ४२३ होते. यामध्ये ...

जिल्ह्यातील ४४५ लाभार्थींनी घेतला पीएम स्वनिधी योजनेचा लाभ
फेरीवाल्यांचे आर्थिक उन्नतीसाठी शासनाने पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी २ हजार ४२३ होते. यामध्ये ९९५ लाभार्थींचे अर्ज मंजूर केले असून ४४५ लाभार्थींना वाटप केले आहे. फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना असली तरी अर्ज करते वेळेस थोड्या प्रमाणात त्रास झाल्याचे फेरीवाल्यांनी सांगितले. एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, इको बँक, आयडीबीयआय आदी बँकांतून हे कर्ज फेरीवाल्यांचे आर्थिक उन्नतीसाठी दिले गेले. ग्रामीण भागातून १ हजार ४०० लाभार्थींनी इतर व्यावसायासाठी पीएम स्वनिधी योजनेतून कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे.
फेरीवाल्यांचे आर्थिक उन्नतीसाठी शासनाने पीएम स्वनिधी योजना सुरु केली असून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ जवळपास पन्नास लाभार्थींनी घेतला आहे. सर्व फेरीवाल्यांना लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र बँकेच्या वतीने कॅम्प घेण्यात आले आहेत. तसेच बँकेच्या माध्यमातून लाभार्थींना अर्ज करते वेळेस नियम व अटीही सांगितल्या जात आहेत. बँकेच्या वतीने कर्ज देण्याच्या उद्देशाने सर्व मदत केली जात आहे. या योजनेसंदर्भात कोणाला काही अडचणी आल्यास त्यांनी बँकेशी संपर्क साधावा.
राजीवकुमार सिंग, व्यवस्थापक, महाराष्ट्र बँक, हिंगोली
शासनाने फेरीवाल्यांचे आर्थिक उन्नतीसाठी पीएम स्वनिधी योजना सुरु केली. या संदर्भात राष्ट्रीयीकृत बँकांना पीएम स्वनिधी योजनेच्या संदर्भात माहिती दिली आहे. कर्ज वेळेवर द्यावे, असेही सूचित केले आहे. बँकांनीही सहकार्य केले आहे.
- व्यवस्थापक अग्रणी बँक
शासनाने गरिबांच्या उन्नतीसाठी पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. याची माहिती कळताच त्यासाठी अर्ज केला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी ऑनलाईन अर्ज मंजूर करुन कर्ज मंजूर केले.
शेख नजीम शेख बागवान, फेरीवाला