कोरोनात ४४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:57+5:302020-12-28T04:15:57+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना आजाराच्या चाचण्यांचे ८५० एवढे उद्दिष्ट असताना त्या तुलनेत अर्ध्याही चाचण्या ...

कोरोनात ४४ टक्के
हिंगोली : जिल्ह्यात कोरोना आजाराच्या चाचण्यांचे ८५० एवढे उद्दिष्ट असताना त्या तुलनेत अर्ध्याही चाचण्या होत नसल्याचे चित्र आहे. कोरोना काळात एकूण ४४ टक्के मृत्यू मधुमेहमुळे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना आजारामुळे वयोगट १ ते २० यामध्ये २, वयोगट २१ ते ४० यामध्ये ३, वयोगट ४१ ते ६० यामध्ये २२, वयोगट ६१ ते ८० यामध्ये २३ तर वयोगट ८१ ते १०० यामध्ये ३ अशा एकूण ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुरुषांची संख्या ३८ असून महिलांची संख्या १५ आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २५ डिसेंबर रोजी कोरोना आजाराच्या रोज एक हजार चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. यात खासगी व शासकीय ओपीडीमध्ये येणाऱ्या व कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर अथवा अँटीजेन चाचणी करुन घेण्यास सांगण्यात आले आहे. तसे जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना आजाराचे प्रमाण अजून तरी कमी झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना किंवा बाहेरगावी जाताना मास्कचा वापर करावा. तसेच सॅनिटायझरचा वापरही जास्तीत जास्त करावा. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.
- डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक
सध्या तरी इतर आजार नाही
कोरोना आजाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्यातरी इतर आजाराचे रूग्ण जिल्ह्यात आढळले नाही, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातून सांगण्यात आले.
नियमित उपचार करुन घ्यावा
मधुमेह रुग्णांनी नियमितपणे आपली तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. अस्वस्थपणा वाटल्यास लगेच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. तपासणी केल्यानंतर दिलेले औषधी वेळेवर व नियमितपणे घेतल्यास मधुमेह बरा होतो.