पोत्रा ग्रा.प.मध्ये ४ जण बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:46+5:302021-01-01T04:20:46+5:30

पोत्रा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ वार्डातून १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. वार्ड १ मधून १० जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये ...

4 unopposed in Potra village | पोत्रा ग्रा.प.मध्ये ४ जण बिनविरोध

पोत्रा ग्रा.प.मध्ये ४ जण बिनविरोध

पोत्रा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३ वार्डातून १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. वार्ड १ मधून १० जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये अनुसूचित जाती पुरुषमधून चाैघे जण, तर अनुसूचित जाती महिला मतदार संघातून तीन, इतर मागास प्रवर्ग पुरुषांतून तिघांनी उमेदवारी दाखल केली आहे. वार्ड २ मधून इतर मागास प्रवर्ग महिलांतून एकच अर्ज दाखल केला. तसेच सर्वसामान्य पुरुषांतून एक अर्ज दाखल केला आहे, तर अनुसूचित जमाती महिलांतून दाेन अर्ज दाखल केले आहेत. वार्ड ३ मधून सर्वसामान्य महिलांतून एकच अर्ज दाखल केला आहे. अनुसूचित जमाती पुरुषांतून तीन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत सर्व ग्रामपंचायत बिनविरोध हाेण्याची शक्यता आहे. यामध्ये शीतल संजय मुलगीर, गणेश चंद्रभान मुलगीर, निता विकास राणगिरे, संजना विजय रणवीर हे बिनविरोध आहेत.

Web Title: 4 unopposed in Potra village