शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वारंगाफाट्यावर दवाखान्यासह 4 दुकानांना भीषण आग; अकरा लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 15:03 IST

मध्यरात्री दीड वाजेपासून चार वाजेपर्यंत लोकांना आग आटोक्यात आणण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे १० मार्च मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एका दवाखान्यासह काही दुकानांना भीषण आग लागली. या आगीत जवळपास ११ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. १० मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक भंगार दुकान, टेलरिंगचे दुकान, मोबाईल शॉपी व दवाखान्याला अचानक आग लागली. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस शिपाई प्रभाकर भोंग, होमगार्ड तसलीम प्यारेवाले यांना दुकानातून धूर निघत असल्याचे कळाले. जवळ जाऊन पाहिले असता आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी वारंगा येथे संपर्कात असलेल्या काही जणांना बोलावून घेतले. तेंव्हा राजेश्वर पतंगे व शेख सलीम हे घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील काही नागरिकांना फोन करून बोलावून घेतले व आजूबाजूच्या ठिकाणाहून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

मध्यरात्री दीड वाजेपासून चार वाजेपर्यंत लोकांना आग आटोक्यात आणण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. तेंव्हा कुठे आग आटोक्यात आली. आगीने रौद्ररूप धरण केले असल्यामुळे दवाखाना व दुकानांतील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. यामध्ये शेख निजाम शेख फकीरसाब यांच्या भंगारचे दुकानातील दोन लाखाचे सामान व त्यांच्याच गोदामातील दोन लाखांचे सामान असे एकूण ४ लाखाचे नुकसान झाले. तर डॉ. प्रदीप निवृत्ती नरवाडे यांच्या दवाखान्यातील विविध प्रकारचे साहित्य जळून चार लाखाचे नुकसान झाले. त्यांच्याच जागेमध्ये असणाऱ्या मोबाईल शॉपीचे अडीच लाख रुपयांचे नुकसान व हनुमंतराव नारायण सोनाळे यांच्या टेलरिंगच्या दुकानातील ३५ ते ४० ड्रेस व टेलरिंगचे साहित्य मिळून ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. वारंगाचे मंडळ अधिकारी पी. ए. काकडे व तलाठी बी. के. मोरे यांनी या घटनेचा पंचनामा केला. सर्वांचे मिळून ११ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

आग आटोक्यात आल्यानंतर अग्नीशामन गाडी आली...दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अग्निशामन दलाला संपर्क साधला असता वसमत, हिंगोली, कळमनुरी व अर्धापूर या चारही ठिकाणचे अग्निशामनच्या सर्व गाड्या हिंगोली येथे मुख्यमंत्र्यांची सभा असल्याकारणाने उपलब्ध होणार नाहीत, असे सांगण्यात आले. दोन-तीनवेळा विनंती केली असता अखेर एक अग्निशामक दलाची गाडी वारंगाफाटा येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आल्यानंतर आली, असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.

टॅग्स :fireआगHingoliहिंगोली