मद्यपींनी रिचविली ३७ लाख बल्क लिटर देशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:22+5:302021-04-12T04:27:22+5:30

हिंगोली : कोरोनाच्या अनुषंगाने गतवर्षी लॉकडाऊन करण्यात आले होतेे. यामुळे २०२० मध्ये एप्रिल महिना पूर्णपणे दारू विक्री बंद होती. ...

37 lakh bulk liters of liquor reached the country | मद्यपींनी रिचविली ३७ लाख बल्क लिटर देशी

मद्यपींनी रिचविली ३७ लाख बल्क लिटर देशी

हिंगोली : कोरोनाच्या अनुषंगाने गतवर्षी लॉकडाऊन करण्यात आले होतेे. यामुळे २०२० मध्ये एप्रिल महिना पूर्णपणे दारू विक्री बंद होती. मात्र, त्यानंतर दोन महिने सोडले तर देशी दारूच्या विक्रीत प्रचंड खप झाला असून एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २१ या कालावधीत मद्यपींनी तब्बल ३७ लाख १८ हजार ८१७ बल्क लिटर दारू रिचविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर विदेशी दारूची ७ लाख ८१ हजार ८१४ तर वाईनची ८ हजार ६३७ बल्क लिटर विक्री झाली आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दररोज रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. गतवर्षीही मद्याची दुकाने तब्बल महिनाभरापेक्षा अधिक काळ बंद ठेवावी लागली होती. या काळात मद्यपींनी चढ्या दरानेही दारूची खरेदी करून तहान भागविली होती. त्यामुळे मे २०२० ते फेब्रुवारी २१ या काळात देशी, विदेशी, वाईन, बियर विक्री करण्यात आली. या काळात मद्यपींनी देशी दारूलाच पसंती दिल्याचे पहावयास मिळत आहे. २०१९-२०च्या तुलनेत कोरोनाच्या काळातही देशी दारू विक्रीत तब्बल ३५ हजार ९० बल्क लिटरची वाढ झाली आहे. यामध्ये मे २०२० ते फेब्रुवारी २१ या काळात तब्बल ३७ लाख १८ हजार ८१७ बल्क लिटर देशी दारूची विक्री झाली. यात

मे २०२० मध्ये २ लाख ४३ हजार ५०६, जून ४ लाख १० हजार ७९८, जुलै ३ लाख ९८ हजार ८६२, ऑगस्ट ३ लाख ५ हजार ६८१, सप्टेंबर ३ लाख ४८ हजार १३६, ऑक्टोबर ३ लाख ८७ हजार ४९८, नोव्हेंबर ३ लाख ९७ हजार ८००, डिसेंबर ३ लाख ८८ हजार ८३९, जानेवारी २१ मध्ये ४ लाख ३० हजार ८९३, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६ हजार ८०४ बल्क लिटर दारू विक्री झाली.

विदेशी विक्रीत ४.९४ टक्के तर वाईनच्या विक्रीत १२३.५८ टक्के वाढ

जिल्ह्यात विदेशी दारूच्या विक्रीत २०१९-२० पेक्षा २०२०-२१ मध्ये ४.९४ टक्के वाढ झाली आहे. २०१९-२०मध्ये ७ लाख ४५ हजार ७ बल्क लिटरची विक्री झाली होती. तर एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २१ मध्ये ७ लाख ८१ हजार ८१४ बल्क लिटर विदेशी दारू विक्री झाली आहे. तसेच वाईन विक्रीतही १२३.५८ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल १९ ते फेब्रुवारी २० मध्ये ३ हजार ८६३ बल्क लिटर वाईन दारूची विक्री झाली आहे. तर एप्रिल २० ते फेब्रुवारी २१ दरम्यान ८ हजार ६३७ बल्क लिटर वाईनची विक्री झाली असून तब्बल वाईनच्या विक्रीत १२३.५८ टक्के वाढ झाली आहे.

बियर विक्रीत १७.८ टक्क्याने घट

जिल्ह्यात फरमनंटेड व माईल्ड अशी बियर विक्री केली जाते. दोन्ही मिळून एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० मध्ये ६ लाख ७७ हजार ९७० बल्क लिटर बियरची विक्री झाली होती. तर एप्रिल २० ते फेब्रुवारी २१ या काळात केवळ ५ लाख ५७ हजार १८४ बल्क लिटर बियरची विक्री झाली आहे.

Web Title: 37 lakh bulk liters of liquor reached the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.