कोरोनाचे नवे ३० रुग्ण; ५६ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST2021-06-02T04:22:49+5:302021-06-02T04:22:49+5:30

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ४३७ पैकी ३ बाधित आढळले. हिंगोली परिसरात ११ जणांपैकी ज्योतीनगर येथे १, ...

30 new patients with corona; 56 Good | कोरोनाचे नवे ३० रुग्ण; ५६ बरे

कोरोनाचे नवे ३० रुग्ण; ५६ बरे

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये ४३७ पैकी ३ बाधित आढळले. हिंगोली परिसरात ११ जणांपैकी ज्योतीनगर येथे १, वसमत परिसरात १३३ पैकी गिरगाव १, औंढा परिसरात २७ पैकी रुपूर तांडा एक बाधित आढळला. सेनगावात ६६ व कळमनुरीत १०० तपासण्यात एकही बाधित नाही. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात नाईकनगर १, बोरी शिकारी १, हनुमाननगर १, लाला लजपतराय नगर १, आनंदनगर २, खुशालनगर १, बेलोरा १, पोळा मारोती १ असे १६ रुग्ण आढळले. कळमनुरी तालुक्यात रुद्रवाडी १, शेवाळा १, बाळापूर १, तांबोळी १, मरडगा १, उमरखेड १, कसबे धावंडा १ असे ७ रुग्ण आढळले. सेनगाव तालुक्यात सुलदली बु येथे एक रुग्ण आढळला. तर बरे झाल्याने आज ५६ रुग्णांना डिस्चार्ज दिला. यामध्ये जिल्हा रुग्णालयातून २६, कळमनुरी १०, सेनगाव ५, लिंबाळा १, वसमत ९ व औंढा येथून ५ जणांना डिस्चार्ज दिला.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ७१० रुग्ण झाले असून, त्यापैकी १५ हजार ५७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजघडीला जिल्ह्यात एकूण २९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ३६३ व्यक्तींचा मृत्यू झाला. सध्या दाखल रुग्णांपैकी ११० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर १६ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

दोघांचा मृत्यू

हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल दोन जणांचा आज कोरोनाने मृत्यू झाला. यात बेलोरा येथील ५४ वर्षीय पुरुष व वाळकी येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Web Title: 30 new patients with corona; 56 Good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.