३ हजार ८७ विद्यार्थ्यांनी दिली दुय्यम सेवा परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:33 IST2021-09-05T04:33:49+5:302021-09-05T04:33:49+5:30

हिंगोली : महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२० या ३ हजार ८७ विद्यार्थ्यांनी दिली. १ हजार ३९० ...

3 thousand 87 students gave secondary service examination | ३ हजार ८७ विद्यार्थ्यांनी दिली दुय्यम सेवा परीक्षा

३ हजार ८७ विद्यार्थ्यांनी दिली दुय्यम सेवा परीक्षा

हिंगोली : महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२० या ३ हजार ८७ विद्यार्थ्यांनी दिली. १ हजार ३९० विद्यार्थी गैरहजर राहिले होते. ४ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोरोना महामारी लक्षात घेऊन सर्व १८ केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील १८ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यात आदर्श महाविद्यालय भाग -छ येथे ३३६ पैकी २३५, भाग -ब ३३६ पैकी २२८, शासकीय तंत्रनिकेतन लिंबाळा येथे २६४ पैकी १८६, सेक्रेट हार्ट येथे २४० पैकी १६२, विद्यानिकेतन हायस्कूल येथे ३६० पैकी २४९, जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे १६८ पैकी १०९, एबीएम इंग्लिश स्कूल येथे १४४ पैकी १०३, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला येथे १२० पैकी ८६, संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे विद्यालय येथे १४४ पैकी ९५, कै. बाबूराव पाटील महाविद्यालय येथे २४० पैकी १५२, अनुसया विद्यामंदिर खटकाळी येथे २८८ पैकी २००, शिवाजी महाविद्यालय कोथळज येथे १४४ पैकी ९६, गुलाब नबी आजाद उर्दू हायस्कूल कळमनुरी येथे ४३२ पैकी २९३, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी येथे ३८४ पैकी २६६, कै. शिवराजमजी मोघे सैनिक विद्यालय येथे १९२ पैकी १२७, कै. शंकरराव सातव महाविद्यालय येथे २४० पैकी १६९, सरजू देवी विद्यालय हिंगोली येथे २०५ पैकी १४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये एकूण ४ हजार ४७७ विद्यार्थ्यांपैकी ३०८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १ हजार ३९० विद्यार्थी गैरहजर होते.

Web Title: 3 thousand 87 students gave secondary service examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.